सध्या कला विश्वही लॉकडाउनमुळे बंद असल्याने सोशल मिडीयावर कलाकार मंडळी प्रचंड एक्टिव्ह आहेत. यातच दररोज सोशल मिडीयावर कलाकार काहीना काही रंजक गोष्टी पोस्ट करताना दिसत आहेत. शिवाय लोकांना घरात बसण्याचही आवाहन करत आहेत.
यातच काही मराठी कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. काही कलाकारांनी त्यांचे जुने तर काहींनी त्यांचे लहानपणीचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. अभिनेत्री रेशम टिपणीस यांनी त्यांचा जुना फोटो पोस्ट केला आहे. त्या जेव्हा 19 वर्षांच्या होत्या तेव्हाचा हा फोटो आहे.
'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत येसूबाईंच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली प्राजक्ता गायकवाडनेही एक जुना फोटो पोस्ट केला आहे. प्राजक्ताने तिचा लहानपणीचा एक गोंडस फोटो शेयर केलाय.
अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम स्मिता गोंदकरनेही तिचा जुना फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केलाय. स्मिताच्या पहिल्या वहिल्या फोटोशूटचा हा फोटो असल्याचं तिने या पोस्टमध्ये लिहीलय.
तर अभिनेत्री वैदेही परशुरामीने तिच्या लहानपणीचे काही फोटो पोस्ट केले आहेत. वैदेही सहा वर्षांची असतानाचा हा फोटो आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी वैदेहीने आणखी एक लहानपणीचा फोटो शेयर केला होता.
लॉकडाउनच्या निमित्ताने सगळे घरीच बसून आहेत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत, तर काही आपला छंद जोपासत आहेत. यातच जुन्या आठवणींमध्ये डोकावण्याची संधीही काहींना मिळालीय.