By  
on  

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले नाना पाटेकर , पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी 50 लाख दान 

कोरोना व्हायरसच्या या संकटासोबत दोन हात करण्यासाठी सरकारला या कार्यात मदतीचा हात म्हणून कलाकार, बिझनेसमन इत्यादींकडून मदतीचा हात मिळतोय. यातच आता अभिनेता नाना पाटेकरही मागे नाहीत. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता नाना पाटेकर यांनीही त्यांचा मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून ही मदत केली जात आहे. 
नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी 50 लाखांची मदत केली जात आहे. म्हणजे एकूण 1 कोटीच्या निधीचं योगदान देण्याचं जाहीर करण्यात आलं आहे. 

 

नुकताच नाना पाटेकर यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन एक व्हिडीओ प्रदर्शित केला. या व्हिडीओमध्ये नाना चाहत्यांना आवाहन करत आहेत. नाना म्हणतात की,  “मला असं वाटत की आपल्या सगळ्यांना आता जात, धर्म आणि पंथ विसरुन सरकारची मदत करायला हवी. एवढ्या मोठ्या संकटासोबत सरकार एकटी लढू शकत नाही. आपल्याला आपली जबाबदारी पार पाडायला हवी. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी नाम फाउंडेशनकडून प्रत्येकी 50 लाखांचे दोन चेक पाढवले जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की घरातून बाहेर पडू नका. सध्या घरात राहणं हीच मोठी देशसेवा आहे. कृपया करुन एवढं करा, धन्यवाद”
नाना पाटेकर यांच्यासारखे कित्येक बॉलिवुड आणि मराठी कलाकारही कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पीएम आणि सीएम फंडसाठी योगदान करत आहेत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive