By  
on  

Quarantine ही गोष्ट घरात आल्याने भूषण प्रधानला झाला आहे, खुप आनंद

सध्या करोना विषाणूमुळे देशावर जी परिस्थिती ओढावली आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतेय.   तसंच या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारनेदेखील २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद ठेवण्यात आलं आहे. यात कलाविश्वाचा देखील समावेश आहे.त्यामुळे सर्वच सेलिब्रिटी घरी राहून सुरक्षित राहण्याचं आवाहन करताना सोशल मिडीयावरुन पाहायला मिळाले. 

दरम्यान लॉकडाऊनच्या काळात कोणी घरकामात व्यस्त आहे, तर कोणी पुस्तकं वाचण्यात रमलंय तर कोणी फिटनेसच्या मागे लागलं आहे. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने वेळेचा सदुपयोग करताना पाहायला मिळतोय. मराठीतला हॅण्डसम अभिनेता आणि चॉकलेट बॉय अशी ओळख असणाराभूषण प्रधानसुध्दा घरीच क्वारंटाईन वेळ घालवतोय. पण नुकतीच त्याच्या घरी एक गोष्ट आली आणि त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

तर त्याचं झालं असं आता मार्च संपून एप्रिल सुरु होतोय आणि सर्वांचा लाडका फळांचा राजा आंब्याचा सीझन जवळ येतोय. या हंगामातला पहिला आंबा चाखण्याची संधी भूषणला मिळाली व त्याचा फोटो त्याने शेअर करत सर्वांना ही आनंदवार्ता सांगितली. 

भूषणच्या आंब्यांचा फोटो पाहून अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्याचे पाहायला मिळतायत, एक तर म्हणतोय'...काय आंबे गोड आहेत का'...तुम्हालासुध्दा ते वाचून खुप धम्माल येईल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

You make me happy

A post shared by B H U S H A N P R A D H A N (@bhushan_pradhan) on

भूषण प्रधानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो आणि पल्लवी पाटील यांची 'आपली लव्हस्टोरी 'हा व्हिडीओ अल्बम अलिकडेच रसिकांच्या भेटीला आला. त्याला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. तर भूषण व प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला 'अजिंक्य' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज होता, परंतु करोना संकटामुळे तो आता पुढे प्रदर्शित होईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive