By  
on  

रिेतेश देशमुखच्या 'माऊली'चा हा लय भारी ट्रेलर तुम्ही पाहिलात का?

अभिनेता रितेश देशमुखच्या माऊली सिनेमाचा मोस्ट अवेटेड लय भारी ट्रेलर नुकताच त्याने ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे आणि यात रितेश देशमुख पंढरपुरातील एका प्रामाणिक व डॅशिंग इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख या पोलिसाच्या अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे. गुंडाराज व अन्याविरुध्द या माऊलीचा संघर्ष यात पाहायला मिळेल. महत्त्वाचं म्हणजे सिनेसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता जितेंद्र जोशी यात खलनायक रंगवतोय. तर अभिनेता सिध्दार्थ जाधवसुध्दा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

रितेश देशमुखची नायिका म्हणून या बहुचर्चित सिनेमात अभिनेत्री सयामी खेर झळकणार आहे. रितेशचे या सिनेमातले संवाद प्रदर्शनापूर्वीच प्रचंड गाजू लागले आहेत. सर्वांनाच आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

‘लय भारी’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर या सिनेमातील माऊली या व्यक्तिरेखेवर हा आगामी सिनेमा आहे. पण हा या सिनेमाचा सिक्वल नाहीय. फक्त व्यक्तिरेखेवर आधारित असलेला हा सिनेमा एका वेगळ्या कथानकावर बेतला आहे.

https://twitter.com/Riteishd/status/1068018359940325376

मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्तान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची प्रस्तुती करत असून रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.

अजय-अतुल या सुपरहिट जोडीच्या संगीताने सजलेला रितेश देशमुखचा ‘माऊली’ येत्या 14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.हा अफलातून ट्रेलर पाहता सिनेमा नक्कीच सुपरहिट ठरणार यात शंका नाही.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive