अमृता खानविलकरने असा साजरा केला पति हिमांशूचा वाढदिवस

By  
on  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सण, उत्सव, वाढदिवस आणि कोणताही कार्यक्रम घरातच साजरा केला जात आहे. सध्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी घरात बसून क्वारंटाईन टाईम सुरु आहे. कला विश्वातील कलाकारही घरात बसून वेळेचा सदुपयोग करत आहेत. 

अभिनेत्री अमृता खानविलकरही घरातच बसून विविध गोष्टी करत आहे. नुकताच पति हिमांशू मल्होत्राचा वाढदिवस अमृताने घरातच साजरा केला आहे. यावेळी केक कापतानाचा व्हिडीओ अमृताने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केला आहे. अमृता आणि हिमांशू दोघंही सोशल मिडीयावर प्रचंड एक्टिव्ह असतात. आणि हिमांशूच्या वाढदिवसाचा हा खास क्षणही अमृताने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. मात्र व्हिडीओत दिसत असलेला केकही घरातच बनवला असल्याचं पाहायला मिळतं. मात्र याविषयी अमृताने पोस्टमध्ये काही लिहीलेलं नाही.

‘नच बलिये’ या डान्स रिएलिटी शोच्या सातव्या पर्वात अमृता आणि हिमांशू स्पर्धक म्हणून होते. आणि त्या पर्वाचे विजेते देखील ठरले होते. टिक टॉक या ऐपवरही अमृता आणि हिमांशू यांचे एकत्र व्हिडीओ पाहायला मिळतात. या व्हिडीओलाही नेटकऱ्यांची पसंती असते.

Recommended

Loading...
Share