एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाउन असताना तबलिकी मरकजवर देशभरातून टीका होऊ लागली आहे. २५ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. मात्र त्यानंतर केंद्र आणि दिल्ली सरकारनं तातडीनं कारवाई करत ही जागा रिकामी केली होती. या सगळ्या घटनेवर अभिनेता आदिनाथ कोठारे याने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. "सध्याच्या स्थितीत असं काही करणं म्हणजे जणू देशावर दहशतवादी हल्लाच करण्यासारखंच आहे" असं ट्विट आदिनाथने केलं आहे. आदिनाथ त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो की, “सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही कारणासाठी एकत्र जमणं मग ते कारण धार्मिक किंवा अधार्मिक असो, हे देशावर दहशतवादी हल्ला करण्यासारखचं आहे. मला या बेजबाबदारपणामुळे आपली लाज वाटते. कृपया करुन घरात राहा.”
Any form of a public gathering in today’s times, religious or non religious, is nothing short of a terrorist attack on our country ! Shame on us for being irresponsible ! Please #StayHomeIndia !!!
— Adinath Kothare (@adinathkothare) April 2, 2020
दिल्लीमध्ये झालेल्या तबलिकी मरकजच्या कार्यक्रमात देशभरातून मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते. एवढचं नाही तर यात विदेशी नागरिकांचाही समावेश होता. एकूण 8 हजारच्या जवळपासं लोकं या ठिकाणी होते. मात्र यातील काहींना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता या घटनेविषयी संताप व्यक्त केला जातोय. आदिनाथने त्याच्या या ट्विटमध्ये कोणताच उल्लेख केला नसला तरी याच प्रकरणाविषयी आदिनाथ बोलत असल्याचं या ट्विटमधून लक्षात येत असल्याचं बोललं जातय.
आदिनाथनेही ट्विटरच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र एकीकडे कोरोनामुळे भयावह परिस्थिती असताना लोकं या गोष्टीकडे गांर्भियाने पाहत नसल्याची चिडही सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.