By  
on  

'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' टीमची अशी रंगली सक्सेस पार्टी

'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या अभिनेता सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाने फक्त प्रेक्षकांच्या मनावर राज्यच केलं नाही तर बॉक्स ऑफीसवरसुद्धा कडक कामगिरी केली. हिंदी सिनेमाना धोबीपछाड करत या मराठी सिनेमाने जबरदस्त य़श मिळवले. आपल्या कामाचं फळ आपल्याला मिळालाहे आनंद सिनेमातीला कलाकारांपासून यासाठी पडद्यामागे झटणा-या प्रत्येकाच्या चेह-यावर झळकत होता.

सुबोध भावेने 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' टीमचा हा मेगा सेल्फी घेतलाय. यात सुबोधची पत्नी मंजिरी भावे, सुमित राघवन, चिन्मयी सुमित, वैदही परशुरामी, लेखक-दिग्दर्शक अभिजीत देशपांडे, प्रसाद ओक आणि मंजिरी ओक, प्राजक्ता माळी, अमृता खानविलकर, अजित परब,आनंद इंगळे आणि कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखील साने यांच्यासह संपूर्ण टीमने एकच जल्लोष केला.

https://www.instagram.com/p/BqyxQfdB5kS/

 

सुबोध भावे, वैदही परशुरामी, आनंद इंगळे, प्रसाद ओक, नंदिता पाटकर, सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी या कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमाला तमाम प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive