By  
on  

पाहा Video : जिजा आणि आई उर्मिला कोठारेने यशस्वीरित्या पूर्ण केला हा टास्क

सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.मनोरंजन विश्वालाही याचा मोठा फटका बसला आहे. 

या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी छंद जोपासतोय तर कोणी घरकामात व्यस्त आहे तर कोणी जुन्या आठवणीत रममाण झालं आहे. पण कोठारे घराण्याची सून अभिनेत्री उर्मिला कोठारे जरा वेगळ्याच कामात व्यस्त आहे. ते म्हणजे, लाडकी लेक जिजाला ती नवनवीन गोष्टी व टास्क शिकविण्यासाठी ह्या क्वारंन्टाईन वेळेचा सदुपयोग करतेय. उर्मिला व जिजाचा एक खास मिनी व्लॉगसुध्दा आहे. तो व्हिडीओ नुकताच इन्स्टाग्रामवर उर्मिलाने शेअर केला आहे. 

उर्मिलाने त्या दिवसाचा टास्क म्हणून जिजाला टीफिन डब्याची झाकणं उघडून ती पुन्हा तशीच व्यवस्थित लावण्याच जबरदस्त असा टास्क दिला व चिमुरड्या जिजाने क्षणाचाही विलंब न लावता तो टास्क य्सवीरित्या पूर्ण केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळतंय.

 

छोटी जिजा खुपच चुणचुणीत आहे. आई उर्मिला कोठारेसोबतचे तिचे अनेक व्हिडीओज खुप व्हायरल होतात. जिजा उत्तम नकलासुध्दा करते, हे अळीमिळी गुपचिळी कार्यक्रमात सर्वांनाच समजलं. दरम्यान, गोड जिजा व तिच्या आईचा वेळ उत्तम जातोय, हेच खरं. मायलेकींच्या पुढच्या व्हिडीओची आम्ही वाट पाहतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive