सोशल मिडीयावर काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध उर्दु कवी डॉ.राहत इंन्दौरी यांची कविता बुलाती है मगर जानेका नही, ही प्रचंड प्रसिद्ध झाली. सोशल मिडीयावर याचा सुळसुळाट झाला. शिवाय त्यांच्या आवाजातील या कवितेच्या ओळींवर लोकं व्हिडीओ करु लागले होते. त्यातच अभिनेत्री सई ताम्हणकरने याची पुन्हा आठवण करुन दिली आहे.
Corona Virus bulataaaa hai par janeka nahi ! #StayHomeIndia #StayHomeStaySafe #IndiaFightsCorona
— Sai (@SaieTamhankar) April 3, 2020
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या देशात लॉकडाउन आहे. मात्र तरीही काही लोकं घराबाहेर पडत आहेत. या लोकांवर आळा घालण्यासाठी सरकार वेळोवेळी सुचना करत आहेत. शिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून काही जण या लोकांना आवाहन करत आहेत. कला विश्वातील कलाकारही विविध पद्धतिने लोकांना घरात बसण्याचं आवाहन करत आहेत. अभिनेत्री सई ताम्हणकरनेही असं आवाहन केलंय मात्र थोड्या हटके पद्धतिने. सईने असं ट्विट केलं आहे की, “कोरोना व्हायरस बुलाता है मगज जाने का नही. घरी राहा सुरक्षित राहा.” सईने केलेलं हे मजेशीर मात्र महत्त्वाचं आवाहन नेटकरी गांर्भियाने घेतील असं म्हणायला हरकत नाही.
सध्याच्या परिस्थितीत सोशल मिडीया हा महत्त्वाच दुवा ठरतोय. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सेलिब्रिटी मंडळीही लोकांना जागरुक आणि घरात बसण्याचं आवाहन करत आहेत.