सध्या क्वारंटाईन काळात तब्बल २१ दिवस प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. या काळात कोणीही घराबाहेर पडणार नाही अशी सरकारने सक्त ताकीद दिली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.मनोरंजन विश्वालासुध्दा याचा मोठा फटका बसला आहे. सर्व मालिका, सिनेमे याचं चित्रिकरण सध्या बंद आहे.
या क्वारंटाईन काळात लाडके सेलिब्रिटीसुध्दा घरीच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. कोणी घरकामात व्यस्त आहे, तर कोणी व्यायामाकडे लक्ष देतेय, तर काहींना नवीन कोष्टी शिकण्याचा छंद लागला आहे. घाडगे आणि सून फेम अभिनेत्रीसुध्दा या मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीचा फायदा पेटी शिकण्यासाठी करतेय. तिने पेटीवर गाणं शिकायला सुरुवात केली व तेसुध्दा लहानपणींच सर्वांचं आवडतं सुंद व सोप्प गाणं असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...यापासून.
ह्या गाण्याचा व्हिडीओ नुकताच भाग्यश्रीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.या व्हि़ीओवर चाहत्यांनी कॉमेट्ंस आणि लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे.
छंदात किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ सत्कारणी लावला तर आपल्यातही एक सकारत्मकता जागरुक होते व वाईट व निराशाजनक गोष्टींपासून आपलं लक्ष आपसूकच विचलित होतं. करोनाच्या या संकटाशी लढण्यासाठी सर्वांनी आज घरीच थांबणं गरजेचं आहे, तरच ही लढाई आपण जिंकू शकू. घरी राहा, सुरक्षित राहा.