लॉकडाउनमुळे सुरु असलेल्या क्वारंटाईन टाईममध्ये घरात बसून काय करायचं असा प्रश्न काहींना पडला असेल. मात्र याचं उत्तर सोशल मिडीयावर सध्या सापडतयं. कलाकार मंडळी घरात बसून या वेळेचा चांगला सदुपयोग करताना दिसत आहेत. कुणी त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून कुकिंग शिकवतय तर कुणी काहीतरी वेगळं शिकवण्याचा प्रयत्न करतय.
अभिनेता गश्मिर महाजनी या क्वारंटाईनच्या काळात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतोय. नुकताच त्याने एक नवा उपक्रम सुरु केला आहेत. गश्मिरने एक व्हिडीओ पोस्ट केल आहे. या व्हिडीओत गश्मिर डान्स करताना दिसतोय. फक्त डान्स करत नाही तर तो डान्स शिकवत पण आहे. होय गश्मिरने घरबसल्या व्हिडीओच्या माध्यमातून डान्स शिकवणी सुरु केली आहे. आणखी असे काही व्हिडीओ पोस्ट करून गश्मिर नृत्याची आवड असणाऱ्यांसाठी हे डान्स ट्युटोरियल्स पोस्ट करणार आहे.
काही दिवसांपूर्वी गश्मिर महाजनीने त्याचे व्यायाम करतानाचे व्हिडीओही पोस्ट केले होते. त्या व्हिडीओजच्या माध्यमातून गश्मिरने घरात राहून कसा व्यायाम करता येईल याची माहिती दिली होती. सध्या घरात बसून गश्मिर या विविध गोष्टी करुन लोकांना सकारात्मक विचार करण्याचं आणि घरात बसण्याचं आवाहन करत आहे.