कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने देशभरात लॉकडाउन घोषीत केलं. या लॉकडाउनमध्ये घरात बसून सगळे क्वारंटाईन टाईममध्ये विविध गोष्टी करत आहेत. कुणी त्यांचा छंद जोपासत आहेत तर कुणी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकरही घरात बसून पतिसोबत, आईसोबत वेळ घालवतेय. अमृता या वेळेत आईला स्वयंपाक घरातही मदत करतेय. शिवाय अमृता तिची एक आवडही या निमित्ताने जोपासतेय. अमृताला म्युझिकची आवड आहे शिवाय किबोर्ड हे वाद्य शिकण्याची तिची इच्छा होती. घरात एक वर्षापासून असलेलं किबोर्ड हे वाद्य शिकायला अमृताने सुरुवात केली आहे. यासाठी अमृता ऑनलाईन शिकवणी घेत आहे. नुकतच पिपींगमून मराठीसोबतच्या लाईव्ह मुलाखतीत अमृताने याविषयीची माहिती दिली. अमृता याविषयी म्हणते की, “एक वर्षापासून किबोर्ड घेऊन ठेवलाय तो शिकतेय, 2 क्लासेस पण झालेत”
अमृता खानविलकर तिची ही आवड जोपासतेय तेव्हा लवकरच अमृता किबोर्ड वाजवतानाही दिसेल यात शंका नाही. शिवाय अमृता घरात बसून व्यायामही करतेय. नुकतच ‘खतरो के खिलाडी’ या एक्शन रिएलिटी शोमध्ये अमृता उत्तम कामगिरी करताना दिसली होती. या वर्षी अमृता ‘मलंग’ या हिंदी सिनेमात आणि ‘चोरीचा मामला’ या मराठी सिनेमात झळकली होती.