घरबसल्या बघा कॉमेडीचा तडका, प्रणव रावराणे घेऊन आलाय ‘कॉमेडीचा राडा’

By  
on  

लॉकडाउनमुळे घरात बसलेले रसिक प्रेक्षक सध्या वेब प्लॅटफॉर्मकडे जास्त वळले आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी वेबवर या निमित्ताने प्रदर्शित होत आहेत. घरात बसलेल्या वेबवरील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेता प्रणव रावराणे सज्ज झाला आहे. 'कॉमेडीचा राडा' हा नवा वेब शो प्रणव घेऊन आला आहे. प्रणव या शोचं सुत्रसंचालन करत असून कॉमेडीचा राडा असं या शोचं नाव आहे. हा एक विनोदी स्टँडअप शो आहे. या कार्यक्रमाचे एकूण 10 एपिसोड असून 21 विनोदी कलाकार या स्टँडअप करताना दिसतील. 

याविषयी प्रणव म्हणतो की, “मी या शोचा होस्ट आहे याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रात प्रचंड गुणवत्ता आहे. आणि हंगामा प्ले, कॅफे मराठीसारखे प्लॅटफॉर्म या प्रादेशिक विनोदवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येत आहेत ही गोष्ट दिलासादायक आहे.”

प्रणव रावराणेने आत्तापर्यंत बऱ्याच मराठी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. या नव्या शोमधूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकेल यात शंका नाही. ‘कॉमेडीचा राडा’ हा शो हंगामा प्ले आणि भागीदार नेटवर्क्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहेत. 
 

Recommended

Loading...
Share