EXCLUSIVE : सैराट फेम रिंकू राजगुरु घरात बसून करत आहे या गोष्टी, आवडतो हा पदार्थ 

By  
on  

लॉकडाउनमुळे कला विश्वाचही काम बंद असल्यामुळे कलाकार मंडळीही घरातच आहेत. मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग कसा करायचा याविषयी कलाकार सोशल मिडीयावर बऱ्याच गोष्टीदेखील शेयर करत आहेत.
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुही अकलुज येथे तिच्या घरात कुटुंबासोबत  आहे. सध्या रिंकू घरात काय काय करतेय याविषयी तिने पिपींगमून मराठीच्या लाईव्ह मुलाखतीत एक्सक्लुझिव्ह सांगीतलं. रिंकूच्या घरी असलेल्या मांजरींना पिल्लं झाली असल्याने रिंकू त्यांच्यासोबतही वेळ घालवतेय. आगामी सिनेमांविषयी विचारंल असता रिंकू म्हणते की, “एक फिल्म येणार होती एप्रिलमध्ये पण या सगळ्यामध्ये ते थांबंल. हे सगळं घडतय ते विचीत्र आहे. पण कामं नंतर करता येतात जीव नंतर येत नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरीच राहा. मला घरी राहून मजा येत आहे. माझी हिंदी वेबसिरीजही येणार होती पण या सगळ्यामुळे ती वेबसिरीजही प्रदर्शित झाली नाही. या वेबसिरीजची दिग्दर्शिका महिलाच आहे. शिवाय माझ्या आगामी सिनेमाची दिग्दर्शिकाही महिला असल्याने भारी वाटतयं.”

शिवाय लोकांना घरात बसण्यासाठीही रिंकूने असं आवाहन केलं. रिंकू म्हणते की, “घरी राहा मजा करा वाईट वाटून घेऊन की कुठे जाता येत नाही. पण या निमित्ताने ज्या गोष्टी तुम्हाला करता आल्या नाहीत त्या नवीन गोष्टी करा.”लॉकडाउनमुळे रिंकूला तिचा बराच वेळ घरच्यांसोबत घालवण्याचीही संधी मिळाली आहे. याविषयी रिंकू सांगते की, “मी सगळं घरकाम करतेय. आणि या सुट्टीमुळे आम्ही चौघं पण एकत्र आलोय. मी चित्र काढतेय, पुस्तकं वाचतेय, स्वयंपाक करतेय, वेबसिरीजही पाहतेय.  शिवाय आम्ही हात सतत धुतोय, भांडी स्वच्छ करतो, सतत पाणी पितो. बेकरी मधून तर काहीच खात नाही. आई भाज्या बनवते त्या भाज्या खातो.” 
रिंकूला स्वयंपाक करायलाही आवडतो. याविषयी ती सांगते की, “मला पुरणपोळी आवडते. मी कधीही कितीही पुरणपोळी  खाऊ शकते. मला बनवताही येते जर पुरण करुन दिलं तर मी व्यवस्थित पुरणपोळ्याही बनवते.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Stay homestay safe #afterworkout#

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 ‘सैराट’ या सिनेमानंतर रिंकूने आर्चीच्या रुपात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर ‘कागर’, ‘मेकअप’ हे सिनेमेही केले. त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र आगामी काळात रिंकू आणखी काय नवं करतेय है पाहणं रंजक ठरेल. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on

 

Recommended

Loading...
Share