'लय भारी' सिनेमात आला होळीचा सण लय भारी.... या गाण्यात अवघ्या काही सेकंदासाठी पती रितेशबरोबर झळकलेल्या जेनेलियाने सर्वांनाच आपल्या अप्रतिम परफॉर्मन्सने आश्चर्यचकित करुन टाकलं होतं. आता आगामी 'माऊली' या बहुचर्चित सिनेमात निर्माती-अभिनेत्री जेनेलिया देशमुख पती रितेशसोबत पुन्हा एकदा हटके अंदाजात थिरकताना पाहायला मिळतेय.
‘धुवून टाक’ या माऊली सिनेमातील गाण्यात रितेश आणि जेनेलिया तब्बल चार वर्षानंतर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करत असून नेहमीप्रमाणेच त्यांनी धम्माल उडवून दिलीय. या गाण्यातसुध्दा लय भारी सिनेमाप्रमाणेच होळीच्या रंगात न्हाउन निघालेल्या नायक-नायिकेचा जल्लोष पाहायला मिळतोय.
https://twitter.com/Riteishd/status/1069111342013964288
‘लय भारी’ सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर या सिनेमातील माऊली या व्यक्तिरेखेवर हा आगामी सिनेमा आहे. पण हा या सिनेमाचा सिक्वल नाहीय. फक्त व्यक्तिरेखेवर आधारित असलेला हा सिनेमा एका वेगळ्या कथानकावर बेतला आहे.
मुंबई फिल्म कंपनी ही हिंदुस्तान टॉकीजच्या सहयोगाने या सिनेमाची प्रस्तुती करत असून रितेशची पत्नी जेनेलिया देशमुख या सिनेमाची निर्माती आहे. आदित्य सरपोतदार या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे.
अजय-अतुल या सुपरहिट जोडीच्या संगीताने सजलेला रितेश देशमुखचा ‘माऊली’ येत्या 14 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.हा अफलातून ट्रेलर पाहता सिनेमा नक्कीच सुपरहिट ठरणार यात शंका नाही.