By  
on  

Lockdown : या कारणामुळे गश्मिर महाजनीला वर्कआऊट करताना येतेय अडचण

सध्या देशभरात लॉकडाऊनमुळे सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक जण आज स्वत:च्या घरात कैद आहे. पण घरी राहा, सुरक्षित राहा हे धोरण प्रत्येकाने अवलंबलचं पाहिजे. सर्वच मालिका, सिनेमे, वेबसिरीज यांचं चित्रिकरणही यामुळे  बंद आहे. सर्व सेलिब्रिटीही घरीच आहेत व घरी राहून कुटुंबियांसमवेत वेळ घालवतायत. 

मराठी सिनेसृष्टीतला हॅण्डसम हंक अशी ओळख असलेला अभिनेता गश्मिर महाजनी किती फिटनेस फ्रिक आहे, आपल्या सर्वांनाच माहितीय. आता घरी असूनही तो होम वर्कआऊटचे विविध प्रकार करुन जीमची कसर भरुन काढतोय. पण नुकतंच त्याच्या या वर्कआऊटमध्ये एक अडचण यायला लागलीय, त्यामुळे तो नीट वर्कआऊट करु शकत नाहीय.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Workout gone for a toss

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 तुम्हालाही प्रश्न पडला असेल  ना, नेमकी कोणती अडचण...   तर त्याचं झालं असं, गश्मीर वर्कआऊट करताना त्यांचा गोंडस चिमुकला त्याच्या मध्ये मध्ये येऊन त्याच्या वर्कआऊटमध्ये खंड पाडतोय. व गश्मिर त्याच्याकडे मला वर्कआऊट करु दे.... अशी गोड याचना करतोय. हा क्युट व्हिडीओ गश्मीरनेच इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Making the most of my time at hand ... stay home. stay safe. self quarantine.

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

 

गश्मीरच्या या क्युट वर्कआऊट व्हिडीओवर चाहत्यांनी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केलाय 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive