आज संपूर्ण जगाला करोना विषाणूने सळो की पळो करुन सोडलंय. या रोगामुळे जगभरात मरण पावलेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. आपल्या देशातही करोनाचे रुग्ण आता झपाट्याने वाढू लागले आहेत. मुंबईत तर ही संख्या लक्षणीय वाढतेय. देशभर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन काळ जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येकाला घरीच राहून सुरक्षित राहायचं आहे. सरकारी यंत्रणांसोबतच पोलिससुध्दा अहोरात्र नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी झटतायत.
तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास अविरत आहेत. आपण या लॉकडाऊनमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहावं म्हणून ते त्यांच्या कुटुंबाला सोडून आपली काळजी घेतायत. त्याचं मनोधैर्य वाढवण्याची एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे.
पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक म्हणून अभिनेता सिध्दार्थ जाधवने एक प्रोत्साहनपर ट्विट त्यांना केलं आहे. सिध्दार्थ म्हणतो, “तुम्ही खरंच खूप महत्त्वाचं आणि उत्कृष्ट काम करत आहात. आमच्या सुरक्षेसाठी तुम्ही जे काम करताय त्यासाठी मनापासून धन्यवाद. कामाप्रती असलेल्या तुमच्या वचनबद्धतेला आणि निर्धाराला मनापासून सलाम. स्वतःची पण काळजी घ्या. खूप प्रेम. आणि मनापासून आभार”, मुंबई पोलिसांनी सिध्दार्थच्या कौतुकाचा मनापासून स्विकार करत त्याला एक गोड रिप्लाय दिला.
Hey! @MumbaiPolice
Nothing to alert. You are doing a seriously great job. Thank you for keeping us safe like always. Hats off to your commitment and determination.
स्वतःची पण काळजी घ्या.
खूप प्रेम.
आणि मनापासुन आभार.— Siddharth Chandekar (@sidchandekar) April 6, 2020
मुंबई पोलिस म्हणाले, तु गुलाबजामसारख्या गोड शब्दांनी आम्हाला जे प्रोत्साहन दिलंस, .आपणही काळजी घ्या! खुप धन्यवाद! असं जबरदस्त रिप्लाय दिला आहे.&nb
Siddharth, Thank You for your encouraging words as sweet as 'Gulabjaam' and being there for us. आपणही काळजी घ्या! धन्यवाद!
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 7, 2020
sp;
खरंय, मुंबई पोलिसांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी न करता, नागरिकांसाठी सतत झटत राहण-या मुंबई पोलिसांना पिपींगमून मराठीचा सलाम !