सध्या देशभरात लॉकडाउन असल्याने सगळे आपापल्या घरात हा वेळ घालवत आहेत. यानिमित्ताने आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी बराच वेळ मिळालाय. कुणी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतय तर कुणी या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी विविध गोष्टी करत आहेत. तर काही लोक या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
घरात बसून बराच वेळ हाती असल्याने काहींना घरात साफ-सफाई करत असताना जुन्या आठवणींचा साठा हाती लागतोय. यातच अभिनेत्री प्राजक्ता माळीनेही काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. कप्पे आवरत असताना जुन्या आठवणी प्राजक्ताला सापडल्या आहेत. प्राजक्ता सध्या सोशल मिडीयावर तिचे जुने फोटो पोस्ट करत आहे.
या दरम्यान प्राजक्ताला तिचे लहानपणीचे फोटो सापडले आहेत. मग काय प्राजक्ताने लगेचच हे फोटोही पोस्ट केले. प्राजक्ताच्या लहापणीच्या या गोंडस फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. यात भावासोबतचे, आई-वडिलांसोबतचे फोटोही प्राजक्ताने पोस्ट केले आहेत.
आता लहानपणीच्या आठवणींमध्ये रमायला कुणाला आवडत नाही. प्राजक्ताही सध्या या अशाच लहानपणीच्या गोड आणि निरागस आठवणींमध्ये रमली आहे. लॉकडाउनचा हा काळ जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देत असल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे.