बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन हे नेहमीच तरुण कलाकारांचं काम पाहिल्यानंतर त्यांना नेहमी पत्र पाठवून प्रोत्साहहित करत असतात. त्यांच्या कामाचं मनापासून कौतुक करतात. आयुष्मान खुराना, विकी कौशल आदी सर्वच कलाकारांना बिंग बींनी पत्र पाठवून त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. पण आता या यादीत एक पहिलं-वहिलं मराठी नाव जोडलं गेलं आहे.ते म्हणजे सोनाली कुलकर्णीचं. त्यासाठी निमित्त होतं ते 'फॅमिली' या शॉर्टफिल्मचं.
संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. सरकारी यंत्रणांवरचा ताण कमी करावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सर्वांना घरी राहण्याचा संदेश देण्यासाठी फॅमिली ही शॉर्ट फिल्म बनविण्यात आली. यात हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगु, बंगाली सर्वच कलाकारांनी सहभाग घेतला, घरातूनच त्यांनी हा अभिनय साकारला. सोनाली कुलकर्णीने आपल्या मराठी सिनेसृष्टीचं प्रतिनिधीत्व केलं,
बिग बी या शॉर्ट फिल्ममध्ये म्हणाले आहेत, संपूर्ण भारतीय सिनेसृष्टी हा आम्ही एक परिवार आहोत. व सोनालीने या शॉर्ट फिल्मध्ये सहभाग घेतला म्हणून, त्यांनी तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत तुला खुप खुप प्रेम व शुभेच्छा असं पत्र लिहून पाठवलं आहे.
अलीकडेच ‘फॅमिली’ ही शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये बिग बी अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, दिलजीत दोसांज, आलिया भट, रजनीकांत, प्रियांका चोप्रा, चिरंजीवी, मोहनलाल, मामुटी, यांच्यासोबतच मराठमोळी सोनाली कुलकर्णी हे कलाकार आहेत.