सध्या लॉकडाउनच्या काळात सगळे घरात बसून आहेत. मात्र या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग विविध पद्धतिने केला जातोय. कुणी कुटुंबासोबत वेळ घालवतोय तर कुणी जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे सध्या जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. केदार शिंदे सध्या त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर जुने फोटो पोस्ट करत आहेत. या जुन्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांना आणखी एक खास आठवण सापडली आहे. ती आठवणही त्यांनी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये ते लिहीतात की, “काय धम्माल दिवस होते ते... एकांकिका स्पर्धा.. हौशी रंगमंच संघटना... १९९१... ओळखा कोण कोण आहेत? सारेच तुमच्या परीचयाचे आहेत. आजचे सुपरस्टार्स....”
1991 सालचा हा फोटो आहे. या फोटोत स्वत: केदार शिंदे, भरत जाधव, अंकूश चौधरी, अरुण कदम, जयराज नायर, संतोष पवार हे कलाकार आहेत. एकांकिका स्पर्धेची ही एक खास आठवण आहे. या निमित्ताने या कलाकारांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहेत. सध्या लॉकडाउनमुळे बहुतांश लोकं जुन्या आठवणींमध्ये रमले आहेत. घरात साफ-सफाई करत असताना जुन्या आठवणी हाताला लागतात मग हे कलाकारही या गोड आठवणींमध्ये रमत आहेत.