पियानो फॉर सेल ह्या दोन पात्री नाटकाचा प्रीमियर नुकताच दादर येथील श्री शिवजी मंदिर नाट्यगृहामध्ये पार पड़ला. नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला ह्यावेळी मराठी सिनेसृष्टीतील तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार आवर्जून उपस्थित होते. उषा मंगेशकर,मीना खडीकर, शिवाजी साटम, किरण शांताराम, अनुप जलोटा,दिपक बलराज विज, गश्मीर महाजनी, अनुराधा राजध्याय आदि मान्यवर उपस्थित होते.
पियानो फॉर सेल ह्या नाटका साठी दोन दिग्गज कलाकार प्रथमच एकत्र आलेले आहेत, त्यामुळे रसिक प्रेक्षकांना हा अनुभव प्रचंड आनंददायी ठरणार आहे . हा अनुभव रंगभुमीवरचा असल्याने तो अधिक रंगतदार, स्वर्णिम ठरतोय . ह्या दिग्गजांचा अभिनय, त्यांच्यातली संवादांची जुगलबंदी, विषयाच्या आशयाला आणि सादरिकरण पियानो फॉर सेल ला एका अतुलनिय उंचीवर घेऊन गेले आहेत. प्रस्तुतकर्ते चैतन्य गिरिश अकोलकर आणि डिज़िटल डिटॉक्स निर्मिती संस्था - ह्यांच्या “पियानो फॉर सेल” या नाटकाद्वारे, एक वेगळा अतुलनीय अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने ज्या दोन दिग्गज अभिनेत्री प्रथमच रंगभुमीवर एकत्र येत आहेत त्या आहेत - वर्षा उसगांवकर आणि किशोरी शहाणे विज.
लेखिका मेहेर पेस्तोनजी लिखित “पियानो फॉर सेल” या मूळ इंग्रजी नाटकाचे नाट्य रुपांतर आणि दिग्दर्शन हे आशिष कुलकर्णी यांचे आहे. अत्यंत आगळ्या वेगळ्या विषयाच्या या नाटकाचे प्रयोग १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात तसेच परदेशातही करण्याचे प्रयोजन आहे.