By  
on  

छोट्या पडद्यावर अवतरणार सोनाली कुलकर्णीच्या अप्सरा...

दिलखेच अदांनी आणि काळजात रुतेल अशा नजरेने अवघ्या महाराष्ट्राला घायाळ करणाऱ्या अप्सरा सोनाली कुलकर्णीचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होत आहे. सोनालीने तिच्या नृत्यातून आणि अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तिच्यावर भरभरुन प्रेम करणाऱ्या रसिकांसाठी तिने यावेळी खास नजराणा आणला आहे.

सोनाली छोट्या पडद्यावर आता परीक्षकांच्या भूमिकेत दिसेल. सोनाली 'अप्सरा आली' या रिऍलिटी शोची परीक्षक म्हणून काम पाहणार आहे. या शोमार्फत महाराष्ट्रातील लावणी या नृत्यप्रकाराची जादू अनुभवायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. या नृत्याविष्काराविषयी माहिती, दिग्गजांची मतमतांतरे याची मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक लावणीच्या विविध अंगाची रसिकांना ओळख करून देतील. यामध्ये लावणीचा मुळचा बाज आणि त्याला नव्याची जोड दिल्याने स्पर्धेत रंगत येईल यात शंका नाही.

नुकताच या कार्यक्रमाचा टिझर रिलीज झाला आहे. आकर्षक टिझरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागली आहे. 5 डिसेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुरुवातीला 12 लावण्यावतींमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.
या शोचं परीक्षण करण्यासाठी सोनाली देखील कमालीची उत्सुक आहे. त्यातच हा कार्यक्रम नृत्याशी संबधित असल्याने परीक्षक म्हणून तिच्यावर खूप मोठी जबाबदारी असल्याचं ती नमूद करते. याशिवाय महाराष्ट्राला असलेली लावणीची समृद्ध परंपरा देखील या शोच्या माध्यमातून प्रत्येकासमोर येईल असं तिला वाटतं. मोठ्याप्रमाणावर चाहतावर्ग असलेली सोनाली सोशल मीडियावरदेखील तितकीच ऍक्टिव्ह असते.

https://twitter.com/Zee_Yuva/status/1067313587545235457

अलीकडेच तिने हुबेहूब तिच्यासारखीच दिसत असलेल्या कठपुतळीच्या बाहुलीच्या नृत्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. ही बाहुली इतकी हुबेहुब होती की पाहणाऱ्याला ती खरी वाटावी. फॅन्सकडून या व्हिडीओ वर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव झाला आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive