By  
on  

आरतीच्या हातचे छोले खाण्यासाठी सिध्दार्थ चांदेकर पोहचला 'सीमेवर'

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. सर्वच या दरम्यान ठप्प आहे. 

मालिका, वेबसिरीज आणि सिनेमे यांचं चित्रिकरणसुध्दा बंद आहे, त्यामुळे आपली कलाकार मंडळीसुध्दा घरीच क्वारंटाईन व्यतीत करतायत. सध्या घराबाहेर पडण्यास प्रत्येकास मनाई आहे. सोसायटीचे नियम , पोलिसांच्या सूचना पाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. या क्वारंटाईनमुळे आपण आपल्याच सोसायटीतल्या लोकांनाही  कदाचित प्रत्यक्ष भेटू शकत नाही असं झालं आहे, जे काय आहे ते फक्त फोनवर व दूरुनच डोंगर साजरे असं झालं आहे. पण याच संदर्भातला एक गंमतीशीर किस्सा नुकताच मराठी सिनेसृष्टीचा हॅण्डसम हंक अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत घडला व त्याला सीमेवर जाण्याचा मोह आवरता आला नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar) on

सिध्दार्थ चांदेकर व अभिनेत्री आरती वाडबाळकर हे दोघंही शेजार-शेजारच्या बिल्डींगमध्ये राहतात. एरव्ही एकमेकांकडे जाण्या-येण्यासोबतच दोघांमध्ये पदार्थांची देवाण-घेवाणही सुरु असते. पण सध्या लॉकडाऊनमुळे त्यांच्या त्यांच्या बिल्डींगला कडक सिक्यूरिटी आहे. कोणीही आत बाहेर करु शकत नाही. अशातच स्वयंपाकाची मानपासून आवड जपणा-या आरतीने अमृतसरी छोल्यांचा बेत आखल्याचे सिध्दार्तला कळले व त्याच्या तोंडाला पाणी सुटले.सिद्धार्थला ते खाण्याचा मोह आवरता आला नाही. आणि सिद्धार्थनं आरतीच्या इमारतीचं मुख्य प्रवेशद्वार गाठलं. मात्र या प्रवेशद्वाराला आतील बाजूनं कुलूप असल्यानं त्याची पंचाईत झाली. शेवटी छोले गेटबाहेरच त्याच्या हातात दिले.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Amritsari chole Wheat and oat bran kulche !! ️ #ilovecooking

A post shared by Aarti Wadagbalkar (@aartiwadagbalkar) on

आरतीनेच हे सीमेवरचं छोले पुराण आपल्या इन्स्टाग्राम सोटरीवरुन शेअर केलं आहे. चाहत्यांनाही ते प्रचंड पसंत पडलंय 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive