Lockdown : पिझ्झा प्रेमी सुयश टिळकचा हा अफलातून फंडा नक्की ट्राय करा

By  
on  

संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा. देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. 

आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तर कोणी स्वयंपाकात रमलं आहे .आवडीचे पदार्थ तयार करत आहे. भरभरुन  चीज आणि भाज्यांचे विविध टॉपिंग्ज याने बेक केलेला गरमा गरम पिझ्झा म्हणजे तुमचा आमचा वीक पॉईंट.

हाच खमंग पिझ्झा नुकताच अभिनेता सुयश टिळकने बनवला. व यासोबतच त्याने चहत्यांना  एक अनोखा फंडासुध्दा ट्राय करायला सांगितलाय. सुयश म्हणतो, एक पिझ्झा स्लाईस खा आणि मरगळ किवा दु:ख दूर करा.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A slice a day keeps the Sad away. Love for Pizza

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

या फोटोत सुयशने खुपच यम्मी पिझ्झा बनवल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे त्याचा हा फंडा आपण नक्कीच ट्राय करुया. 

Recommended

Loading...
Share