करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील साऱ्या यंत्रणा युध्द पातळीवर काम करत असल्या तरीही रुग्णांच्या संक्येत लक्षणीय होणारी वाढ ही बाब चिंताजनक ठरत आहे. देशभरात २४ तासांमध्ये ८९६ नव्या रुग्णांची भर पडली असून ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईची काळजी तर दिवसेंदिवस वाढतेय. दररोज नव्या रुग्णांची भर पडताना पाहायला मिळतेय. कधी एकदा या करोनाच्या विळख्यातून आपण सुटतोय असं आज प्रत्येकाला वाटत आहे.
देशभरात पंतप्रधान मोदींनी तब्बल २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. मालिका, वेबसिरीज, चित्रपट सर्वांचंच शूटींग बंद आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे व सर्व नागरिकांना, देशवासियांना घरात राहण्याचं आवाहन करताना पाहायला मिळतायत. पण 'तुला पाहते रे' फेम इशा म्हणजेच सर्वांची लाडकी अभिनेत्री गायत्री दातारने एका भन्नाट स्टाईलने करोना कधी जाईल असा मिश्किल सवाल इन्स्टाग्रामवरुन केला आहे.
गायत्रीने करोना जाईला का हा थेट प्रश्न भोलनाथलाच विचारला आहे. ती म्हणते," सांग सांग भोलानाथ...Covid जाईल का? कोरोनाची साथ संपुन सुट्टी संपेल काय?सांग सांग भोलानाथ! " जसं भोलानाथला आपण लहानपणी पाऊस पडेल काय...असा सवाल करायचो,त्याच भाबड्या शब्दात व स्वरात तिने हा सवाल केला आहे. इथे ती भोलानथला सुट्टी मिळावी म्हणून नाही तर करोना संपून सुट्टी संपावी म्हणून याचना करतेय.