सध्या लॉकडाऊनच्या काळात विविध सेलिब्रेशनही घरातच होत आहे. अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे दोघही त्यांच्या आयुष्यातील खास दिवसाचं सेलिब्रेशन घरातच करतील.
अभिनेत्री सखी गोखले आणि सुव्रत जोशी यांचं मागील वर्षी लग्न झालं होतं. आज त्यांच्या लग्नाला एक वर्षे पूर्ण होत आहेत.
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. मालिकेच्या सेटवरच दोघांची चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झालं. त्यानंतर ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातही त्यांनी एकत्र काम केलं होतं. लॉकडाउनमुळे सध्या दोघंही लंडनमध्ये आहेत.
मागील वर्षी त्यांच्या लग्नाचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. दोघांच्या लग्नात त्यांचे बरेच कलाकार मित्रमंडळीही सहभागी झाले होते.