By  
on  

'घर होतं मेणाचं' मधून उलगडणार स्त्री मनाचा भावनिक पैलू...

समाजातील व्यवस्थेत स्त्री हा घटक कायमच दुर्लक्षित राहिला आहे. पण कलेच्या क्षेत्रात स्त्री या विषयाला अनुसरून अनेक कलाकृती बनल्या आहेत. चित्रपटक्षेत्रही यात मागे नाही. आजवर मराठीतही अनेक स्त्रीप्रधान सिनेमांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'घर होतं मेणाचं'. मोहन जोशी आणि अलका कुबल हे दोन दिग्गज कलाकार या सिनेमाच्या माध्यमातून एकत्र झळकत आहेत. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी आपल्याला सिनेमात पाहायला मिळणार आहे.

या सिनेमात मोहन जोशी आणि अलका कुबल यांच्यासोबतच  अविनाश नारकर, सिद्धार्थ जाधव, पल्लवी सुभाष हे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत आहेत. राजेश चव्हाण यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. असं असलं तरी काही ठिकाणी त्यांना अजूनही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही. नेमक्या याच विषयाला हात घालण्याचं काम हा चित्रपट करतो.

स्त्रियांचा आत्मसन्मान हा पुरुषां इतकाच महत्त्वाचा असतो. हे या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील स्त्री सशक्त आहे, पण व्यक्त होण्यात कुठे तरी कमी पडत असल्याने ती कायमच दुय्यम स्थानी रहाते. नेमकी ही घुसमट पडद्यावर दाखवण्यात कलाकार कितपत यशस्वी ठरतात हे लवकरच दिसून येईल. या चित्रपटाची निर्मिती ज्ञानेश्वर शेटे आणि ज्ञानेश्वर ढोके यांनी केली आहे.

https://youtu.be/RFAK3bbn-TA

Recommended

PeepingMoon Exclusive