By  
on  

...आणि स्वप्निल जोशीचं हे स्वप्न सत्यात उतरलं, वाचा सविस्तर

मराठी सिनेसृष्टीतला सुपरस्टार अशी अभिनेता स्वप्निल जोशीची ओळख आहे. ९० च्या दशकातील दूरदर्शनवरचा लाघवी कृष्ण ते आजचा सुपरस्टार अशी स्वप्निलची यशस्वी घौडदौड सुरु आहे.पण तरीही त्याचे पाय जमिनीवर आहेत. नेहमीच  मिळून-मिसळून वागणारा आणि प्रत्येक सहकालाकराला समजून घेणारा अभिनेता अशी त्याची ख्याती आहे. सध्या स्वप्निलचं एक स्वप्न सत्यात उतरलंय आणि त्याचा त्याला अतिशय आनंद झाला आहे. 

हे स्वप्न म्हणजे स्वप्निलची स्वत:ची वेबसाईट त्याने नुकतीच लॉंच केली आहे. ही घोषणा करताना त्याला खुप अभिमान वाटतोय.त्यानेच इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ  शेअर करत ही माहिती दिली. या वेबसाईटविषयी बोलताना स्वप्निल  म्हणाला, "ब-याच काळापासून हे माझं स्वप्नं होतं. आता ही वेबसाईट तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे. या वेबसाईटमध्ये माझा संपूर्ण अभिनय प्रवास, नवनवीन फोटो, माझे सिनेमे, माझे आगामी प्रोजेक्ट या सर्वांची इत्यंभूत माहिती तुम्हाला मिळेल, एवढंच नाही तर तुम्ही तुमचा अभिप्राय मला इथे देऊ शकता ज्याची मी आतुरतेने वाट पाहतोय. तसंच महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझ्याशी येथे थेट संपर्क साधता येईल. तेव्हा थेट संपर्क करा तुम्हाला खुप प्रेम"

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive