मराठी चित्रपटसृष्टी पूर्वीपेक्षा जास्त प्रगल्भ होत चालली आहे. त्यामुळेच हिंदीमधील कलाकारांनाही मराठीत काम करण्याचा मोह आवरत नाही.त्यामुळे आतापर्यंत अनेक हिंदी कलाकारांची मराठीत वर्णी लागली आहे. त्यातच आता सयामी खेरची भर पडली आहे.
रितेश देशमुखच्या आगामी माऊली या चित्रपटामधून सयामी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. सयामीने या आधी हिंदीमधील 'मिर्झिया' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अभिनयाचे धडे गिरवले आहेत. 'रे' या तेलुगू चित्रपटात तिने काम केलं आहे.
सयामीला मराठी चित्रपटात काम करताना भाषेची अडचण अजिबात जाणवली नाही. कारण सयामी उत्तम मराठी बोलते. पण माऊलीसाठी तिला ग्रामीण ढंगाचं मराठी बोलावं लागणार होतं. अशावेळी तिच्या मदतीला धावून आला सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थणे तिला ग्रामीण भाषेतील शब्दांचे उच्चार कशा प्रकारे करावे हे शिकवलं. त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलर पाहताना सय्यामी हिंदी बोलते असं सांगून सुद्धा पटत नाही. आता सिनेमा रिलीज झाल्यावर सिद्धर्थाची शिकवणी सयामीच्या कितपत उपयोगी पडली आहे ते दिसून येईलच.