By  
on  

पदार्थच अनोळखी वाटू लागल्यावर माणसाने काय करायचं ? - कुशल बद्रिके

लॉकडाउनच्या निमित्ताने  सगळ्यांना सध्या बराच वेळ आपल्या कुटुंबासोबत मिळालाय. यातच काही लोकं कुकिंकडेही वळली आहेत. घरात बसून विविध पदार्थ बनवत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पदार्थाची चव चुकते तिथपर्यंत ठिक आहे, पदार्थच अनोळखी वाटू लागल्यावर माणसाने काय करायचं ? आमची ही म्हणत होती गुलाबजाम केलेत . ते खायचे कसे तेवढच कळत नव्हत फक्त मला. ह्या lockdown मधे आणखीन काय काय बघायला मिळणार आहे कोणाच ठाऊक तुमच्याघरी ओळखीचे पदार्थ होतात काओ?

A post shared by Kushal Badrike official (@badrikekushal) on

अभिनेता कुशल बद्रिकेने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत घरात गुलाबजाम बनत असल्याचं पाहायला मिळतय. मात्र या गुलाबजामचा बेत अपयशी झाल्याने या व्हिडीओतून कुशल पत्निच्या कुकिंगची मस्ती केली आहे. कुशल या पोस्टमध्ये म्हणतो की, "पदार्थाची चव चुकते तिथपर्यंत ठिक आहे, पदार्थच अनोळखी वाटू लागल्यावर माणसाने काय करायचं ? आमची ही म्हणत होती गुलाबजाम केलेत .
ते खायचे कसे तेवढच कळत नव्हत फक्त मला.ह्या lockdown मधे आणखीन काय काय बघायला मिळणार आहे कोणाच ठाऊक तुमच्याघरी ओळखीचे पदार्थ होतात काओ?" 

चक्क पदार्थच ओळखू येत नसल्याचं मेजशीर कॅप्शन कुशलने यात लिहीलय. मात्र आणखी गंमत म्हणजे या पोस्टवर श्रेया बुगडेने केलेली कमेंट. चला हवा येऊ द्या या शोमध्ये श्रेया आणि कुशलची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळते. मात्र या पोस्टमध्ये श्रेया कुशलच्या पत्निच्या बाजुने बोलतेय. श्रेया कमेंट करते की, "मिळतय ते चुपचाप गिळ कुशल, सुनयना काही नाही गं होते असे" 

सध्या सोशल मिडीयावर कलाकारांच्या अशा मजेशीर पोस्ट पाहायला मिळत आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive