देशभर पंतप्रधांनी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणारी वाढ हे या मागचं मोठं कारण. आज सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत घालवत आहे. छंद जोपासत आहेत. काहीतरी नवीन शिकत आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. पण घरबसल्या तुम्हाला खुपच कंटाळा आला असेल, तर तुम्ही अभिनेता ललित प्रभाकरची 'खिडकी' नक्कीच पाहू शकता.
खिडकी...तुम्ही म्हणाल, आम्ही कशी त्याच्या घराची खिडकी पाहणार..तो लाईव्ह खिडकीतून संवांद वगैरा साधतोय का, ..तर असं बिलकुल काहीच नाही...लाडका अभिनेता ललित प्रभाकरची 'खिडकी' ही शॉर्ट फिल्म नुकतीच रसिकांच्या भेटीला आली आहे. घरबसल्या तुम्ही ती आरामात अवघ्या ३० मिनिटांची फिल्म यु ट्यूबवर पाहू शकता. ही शॉर्टफिल्म पाहण्याचं आवाहन चाहत्यांना ललितने त्याच्या इन्स्टाग्रामपेजवरुन केलं आहे. त्याच्या मते, हा फिल्म तुमच्यासोबत दीर्घकाळ राहील.
रोहन कानवडे लिखीत-दिग्दर्शित 2017 साली प्रदर्शित झालेली 'खिडकी'ची इफ्फी गोवा फेस्टिव्हलसाठी निवड झाली होती. तसंच अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय भारतीय सिनेमहोत्सवात या शॉर्ट फिल्मचं स्क्रिनींग करण्यात आलं आहे.
ललित प्रभाकरसोबतच 'खिडकी' या शॉर्टफिल्ममध्ये कल्याणी मुळे, अभय कुलकर्णी, वीणा नायर, प्रणिता म्हात्रे, रोहित शाह, मिहीर माहेर, हरीश रेड्डीपल्ली आदी कलाकारांनी यात भूमिका साकरल्या आहेत.
पाहा 'खिडकी' शॉर्ट फिल्म