एक वर्षभरापूर्वी मी नैराश्येसोबत लढत होतो – सुयश टिळक

By  
on  

लॉकडाउनमध्ये कला विश्वातील कलाकारही घरात बसून वेळ घालवत आहेत. अभिनेता सुयश टिळकही सध्या त्याच्या घरात आहे. आणि घरात बसूनच तो विविध गोष्टी करत आहे. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत सुयशने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट शेयर केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A slice a day keeps the Sad away. Love for Pizza

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

सुय़शने या मुलाखतीत तो वर्षभरापूर्वी नैराश्येमध्ये असल्याचं सांगीतलं. मात्र तो त्यातून बाहेर आल्याचही तो बोलला.   याविषयी तो बोलत असताना म्हटला की, "एक वर्षभरापूर्वी मी नैराश्येसोबत लढत होतो. पण त्यातून बाहेर आलो. पण आनंदी राहण्यासाठी आजचा विचार करा जास्त अपेक्षा ठेवू नका." नैराश्येमधून बाहेर आलेल्या सुयशने सध्या सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सकारात्मक राहण्याचा आणि आजचा विचार करण्याचा संदेश यानिमित्ताने दिला आहे. शिवाय यावेळी चाहत्यांसोबत बोलत असताना त्याच्या प्रसिद्ध मालिका 'का रे दुरावा' आणि 'बापमाणूस' यांचे दुसरे भाग आल्यास आनंद होईल असही तो म्हटलाय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don’t forget to !

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk) on

सध्या घरात बसून सुयश सिनेमे पाहतोय, वेब सिरीज पाहतोय, कुकिंग करतोय, पुस्तकं वाचतोय. 

 

Recommended

Loading...
Share