छोट्या पडद्यावरुन घराघरांत पोहचलेली आणि आता मराठी सिनेसृष्टीत चांगलाच जम बसवलेली अभिनेत्री आहे, सायली संजीव. अनेक सिनेमे तिचे प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. लॉकडाऊनपूर्वीच सायलीच्या अनेक सिनेमांची घोषणा सोशल मिडीयावर पाहायला मिळाली होती. त्यापैकी एबी आणि सीडी हा सिनेमा प्रदर्शितही झाला होता. पण नंतर लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमागृह बंद करण्यात आली. मना फकीरानंतर बस्ता, पैठणीची गोष्ट हे सायलीचे सिनेमे आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत.
अभिनेत्री सायली संजीवच्या साडीतल्या या अदा पाहून तुम्ही नक्कीच व्हाल घायाळ.
विविध रंगाच्या साडीत सायली नेहमीच खुलून दिसते.
पिवळा, जांभळा, लाल अशा व्हायब्रंट कलर्सच्या साड्यांसोबतच सायली लाईट कलर्सनासुध्दा पसंती देताना पाहायला मिळते.
पारंपारिक लाल रंगाच्या शालूवर नॉड लावलेला हा हटके ब्लाऊजमधून सायलीने स्टायलीश लूक दिला आहे.
ग्रे कलरच्या पैठणीमध्ये साध्या लुकमधूनही सायली खुलून दिसली.
नववधूच्या वेषात पिवळी पारंपारिक नऊवारी नेसलेल्या सायलीच्या सौंदर्यात चार चॉंद लागले आहेत.
गडद जांभळ्या रंगाची ही साडी सायलीवर खुप उठून दिसतेय.
ही काळ्या रंगाची चेक्सची साडी आणि पट्टीचा स्लिव्हलेसमध्ये सायली भलतीच स्टायलीश दिसली.
खणाच्या ब्लाऊज व ग्रे रंगाच्या साडीमध्ये सायली खुप सुंदर दिसली
ब्लाऊजची हटके स्टाईल करुन या साडीत सायलीने वेस्टर्न स्टाईल केल्याचे पाहायला मिळाले,
या गडद गुलाबी रंगाच्या डिझाीन असलेल्या साडीवर खुपच साधा मेकअप व केसांची स्टाईल सायलीने केली असली तरी ती लक्षवेधी ठरतेय.