बोलक्या डोळ्यांचा, निरागस चेह-याचा सोमनाथ अवघडे हा याने तारुण्याच्या उंबरठ्यावरील पण घरात सतरा विश्वे दारिद्रय असलेला 'फॅन्ड्री'तला जब्या समरसून साकारला.
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'फॅन्ड्री' या पहिल्याच वेगळ्या वाटेवरच्या सिनेमाने अनेक विक्रम रचले.
काळ्या चिमणीची राख मिळवण्यासाठी अतोनात प्रयत्न करणा-या या जब्याला तुम्ही-आम्ही विसरुच शकत नाही.
अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला सोमनाथ मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्याशा गावचा. सोमनाथचे वडील पोतराज. तो त्यांचा पिढीजात व्यवसाय. ते हलगीही वाजवत. त्याची आई शेतात मोलमजुरी करत असे.सोमनाथचे कुटुंब तसे सामान्य कष्टकरी कुटुंब.
फँड्रीतील भूमिकेमुळे एका रात्रीत सोमनाथ ‘हिरो’ झाला. त्याने गावाची मान उंचावल्याची गावकऱ्यांची भावना आहे. त्यांनी त्याच्या सिनेमाचं यश त्यावेळी गावात मोठ्या थाटात साजरं केलं होतं.
मराठी सिनेसृष्टीसाटी मैलाचा दगड ठरलेल्या सिनेमातील भूमिकेसाठी सोमनाथला ६१ व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सोमनाथने २०१५ साली १० वीची परिक्षा दिली आहे. सध्या तो आता करिअरवर लक्ष केंद्रित करतोय.
महत्त्वाचं म्हणजे नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि महानायक अमिताभ बच्चन स्टारर झुंड या आगामी बॉलिवूड सिनेमात जब्याची वर्णी लागली आहे, म्हणजेच सोमनाथ अवघडेची.
परंतु सोमनाथच्या व्यक्तिरेखेबद्दल अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. त्याच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
ये्त्या रविवारी म्हणजे १९ एप्रिल रोजी सर्वांना फॅण्ड्री सिनेमा घरबसल्या सहकुटुंब पाहता येणार आहे.