By  
on  

एका लग्नाची पुढची गोष्ट’ ऐकायला येणा‌‌-या प्रेक्षकांच्या गर्दीत वाढ

पती-पत्नीच्या आंबटगोड नात्याला अनेक पैलू असतात. कधी चांगल्या तर कधी वाईट प्रसंगात त्यांचं नातं अधिकच घट्ट होत जातं. या लग्नाच्या लग्नाच्या नात्याची गोडी पडद्यावर अनुभवणं हा प्रेक्षकांसाठीदेखील आनंददायी अनुभव असतो. नेमका हाच अनुभव चाहत्यांशी शेअर करण्यासाठी प्रशांत दामले आणि कविता लाड घेऊन आले आहेत नाटक, ‘ एका लग्नाची पुढची गोष्ट’. हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्याचं दिसून येत आहे.

पहिला भाग ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद आता एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकला मिळताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे ‘बुक माय शो’ या साईटवर गेले पंधरा दिवस सलग हे नाटक बुकिंगमध्ये अव्वल राहिलं आहे. प्रशांत दामले यांनी सोशल साईट्सवरून ही बाब चाहत्यांशी शेअर केली आहे.  एखादं नाटक सलग पंधरा दिवस बुकिंगमध्ये टॉपला असणं हे पहिल्यांदाच घडताना दिसून येत आहे. त्यामुळे मराठी नाटकंही आता चित्रपट आणि इतर मनोरंजन माध्यमांच्या तोडीस तोड आहेत असं म्हणायला हरकत नाही.

या नाटकातील पात्र मन्या आणि मनी आता संसाराच्या मध्यावर आहेत. लग्नानंतरच्या नव्या प्रेमाचा बहर ओसरून त्यातल्या खाचखळग्यांची जाणीवही दोघांना होऊ लागली आहे. अशा वेळी घडणार्या गमतीजमती अनुभवायच्या असतील तर हे नाटक पहायलाच हवं.

Recommended

PeepingMoon Exclusive