By  
on  

आणि ‘सूर नवा ध्यास नवा..’च्या सेटवर ‘माऊली’ सर्जेराव देशमुखच्या डोळ्यात तरळले अश्रू

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची माऊली टीम नुकतीच कलर्स मराठीवरील सर्वांचा आवडता कार्यक्रम सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीरच्या सेटवर नुकतीच उपस्थित राहिली होती. यावेळी छोट्या सूरवीरांनी ‘माऊली’चं जोरदार स्वागत केलं.  मात्र या सेटवर रितेश अचानकपणे रडू कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मुलं एकापेक्षा एक गाणं सादर करत कॅप्टन्स आणि पाहुण्यांना खुश करण्यात कुठलीच कसर सोडत नव्हते. पण छोटी गायिका मीराने ‘बाबा थांब ना रे’ हे गाणं मंचावर सादर केलं आणि कार्यक्रमात रितेश देशमुख व सिध्दार्थ जाधव यांना आपले अश्रू लपवता आले नाहीत. ते या गाण्याने प्रचंड भावूक झाले होते.

तसंच सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचा खरा हिरो असलेला छोट्या हर्षद नायबळने ‘माऊली’ची भूमिका साकारत विटांची भिंत तोडून धमाकेदार एण्ट्री केली. इतकंच नाही तर त्याने या सिनेमातले काही संवाददेखील म्हणून दाखविले. त्यामुळे हा माऊली विशेष भाग अजिबात चुकवू नका. १० ते १२ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर

तर रितेश देशमुखचा माऊली आपल्या भेटीला 14 डिसेंबर 2018 ला येत आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive