By  
on  

Exclusive: रितेश देशमुखची इच्छा,पत्नी जिनीलियाने करावं मराठी सिनेमात पदार्पण

‘आपल्यासारखा टेरर नाय’ म्हणत माऊली सर्जेराव देशमुख लवकरच प्रेक्षकांसमोर दबंग एन्ट्री घेणार आहेत. सर्वांनाच आता माऊली कधी प्रदर्शित होतोय आणि आपण तो पाहतोय याची उत्सुकता शिगेला पोहचलीय. अॅक्शन, ड्रामा, रोमान्स आणि इमोशन्स असं मनोरंजानं खच्चून भरलेलं पॅकेज घेऊन लय भारी अभिनेता रितेश देशमुख प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  पिपींगमून मराठीने नुकतीच ‘माऊली’टीमसोबत एक खास बातचित केली.

अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री व निर्माती जिनीलिया यांनी पती रितेशच्या लय भारी या ब्लॉकब्लस्टर सिनेमातील 'आला होळीचा सण लय भारी....चल नाचूया' गाण्यात आपली छोटीशी झलक दाखवत मराठी प्रेक्षकांची मनं जिंकली, त्यानंतर आता माऊलीमध्ये 'धूवून टाक' हे पूर्ण गाणंच रितेश आणि जिनिलिया या रिअल लाईफ क्यूट जोडीवर चित्रीत झालंय. तेव्हा जिनिलिया देशमुख या मराठी सिनेमात कधी पदार्पण करणार असा प्रश्न तुम्हा-आम्हा सर्वांनाच पडलाय. मग पिपींगमून मराठीने हा जिनिलिया वहिनींच्या मराठी पदार्पणाविषयीचा प्रश्न थेट रितेश भाऊंनाच विचारला.

रितेश देशमुख मोठ्या उत्साहात या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले,"जिनिलीयाने आत्तापर्यंत अनेक विविध भाषांमध्ये काम केले आहे. तमिळ, तेलुगू, हिंदी यासारख्या विविध भाषांमध्ये त्यांनी अभिनेत्री म्हणून नाव कमावलंय. त्या घरी माझ्यासोबत व इतर कुटुंबियांसोबत उत्तम मराठी बोलतात. त्यामुळे सिनेमा करण्यासाठी त्यांना भाषा ही अडचण अजिबातच नाहीय. माझीसुद्धा खुप इच्छा ाहे की, त्यांनी एक मराठी सिनेमा जरुर करावा. फक्त त्यासाठी मी एका चांगल्या कथेच्या शोधात आहे."

या मुलाखती दरम्यान माऊली सिनेमाचे लेखक क्षितीज पटवर्धनसुध्दा उपस्थित होते. तेव्हा रितेश मस्ती मूडमध्ये त्यांना म्हणाला की तुम्ही जर आम्हाला लवकर स्क्रीप्ट द्यावी. आम्ही त्याची वाट पाहतोय.

https://www.instagram.com/p/Bq419rIBwST/

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive