By  
on  

खरा मी, खोटा मी आणि लॉकडाऊनचे २८ दिवस, सांगतोय गश्मिर महाजनी

लॉकडाऊनमध्ये बरेच कलाकार सोशल मिडीयावर काहीतरी वेगळं पोस्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लॉकडाउनमध्ये दररोज विविध व्हिडीओ पोस्ट करुन लोकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि घरात बसण्याचं आवाहन करण्यासाठीही विविध व्हिडीओ पोस्ट केले जात आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

खरा मी, खोटा मी आणि लाॅकडाऊनचे २८ दिवस

A post shared by Gashmeer Mahajani (@mahajani.gashmeer) on

अभिनेता गश्मिर महाजनीदेखील या लॉकडाउनमध्ये विविध व्हिडीओ पोस्ट करत आहे. फिटनेस, डान्स याविषयीचे विविध व्हिडीओ गश्मिरने पोस्ट केले आहेत. आणि आता नुकताच गश्मिरने आणखी एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गश्मिरने फेसबूक वर्सेस रिएलिटी हा विषय निवडलाय.  फेसबूकवर पोस्ट करण्यात येणारे व्हिडीओ आणि खऱ्या आयुष्यातील त्या व्हिडीओचं खरेपण यात मजेशीर पद्धतीने पाहायला मिळतय. या आधी गश्मिरने पोस्ट केलेल्या व्हिडीओत डान्स टीप्स किंवा व्यायामाचे प्रकार होते. मात्र हा  कॉमेडी व्हिडीओही गश्मिरने घरातच शूट केला आहे.

लॉकडाऊनच्या निमित्ताने गश्मीरपण त्यांच्या कुटुंबासोबत घरी आहे. मात्र अशा मजेशीर व्हिडीओच्या माध्यमातून गश्मीर सोशल मिडीयावरील त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतोय.
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive