By  
on  

'प्रेमवारी' सिनेमाचा हा फर्स्ट लूक पोस्टर तुम्ही पाहिला का?

'प्रेम' या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित 'प्रेमवारी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या सिनेमाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी अनावरण करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून हा नक्कीच एक रोमँटिक सिनेमा वाटत आहे.

'प्रेमवारी' या सिनेमाच्या  पोस्टरवर सिनेमातील मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे दिसत आहेत. व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या सिनेमातून मयुरीच्या कापडणेच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

साईममित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले आहे. या रोमॅॆटीक सिनेमाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive