ज्या व्यक्तिकडून आपल्याला प्रेरणा मिळते, जे आपले आदर्श असतात त्या व्यक्तिचा आपण आदर करतो. कला विश्वात काम करणाऱ्या बहुतांश कलाकारांसाठी बिग बी अमिताभ बच्चन हे आदर्श आहेत. त्यांच्याकडून कित्येकांना प्रेरणा मिळते. फक्त आदर्शच नाही तर काहींसाठी ते अभिनयाचे विद्यापीठ आहेत.
असाच एक मराठी अभिनेता बिग बी अमिताभ बच्चन यांचा प्रचंड मोठा चाहता आहे. तो अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण हा बिग बींचा इतका मोठा चाहता आहे की लॉकडाउनच्या या काळात घरात बसून त्याने चक्क बिग बींसाठी एक पत्र लिहीले आहे. बिग बी त्यांच्या प्रत्येक भूमिकांमधून आणि आजही सतत काम करून कशी ऊर्जा देतात हे त्याने या पत्रात नमूद केलं आहे. हे पत्र त्याने वाचून दाखवून त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये संकर्षण लिहीतो की, “नमस्कार.. मी लिहिलेल्या ह्या पत्रातला प्रत्येक शब्दं माझं त्यांच्यासाठीचं प्रेम आहे.. ९ मिनिटांचं हे पत्रं Lockdown मुळे मिळालेल्या वेळेचा सद्उपयोग करुन शक्यं तितकं चांगलं करण्याचा, सजवण्याचा प्रयत्नं केलाय. “वेळ असेल तेंव्हाच शांतपणे ऐका.. पहा..” (शक्यं असेल तर; earphones वापरा..) आणि तुमचंही त्यांच्यासाठीचं प्रेम ह्यात शब्दबद्ध झालंय असं वाटलं तर, कळवा मला.”
सोशल मिडीयावर संकर्षणच्या बिग बींसाठीच्या या पत्राचं कौतुक होत आहे.