By  
on  

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी विजेताची टीम म्हणते 'लढ रे'

देशातील पोलिस, डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचारी कोरोनाशी दोन हात करत आहेत. यातच या योद्धांचं विविध माध्यमातून कौतुक केलं जात आहे.

मनोरंजन विश्वातील कलाकार या वॉरियर्सना विविध व्हिडीओच्या माध्यमातून सलाम करत आहेत. यातच ‘विजेता’ या मराठी सिनेमाची टीमही पुढे सरसावली आहे. या सिनेमातील ‘लढ रे’ या गाण्यातून त्यांनी ट्रीब्यूट दिलं आहे. सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकतेची अत्यंत गरज असल्याने या गाण्यातून ती सकारात्मकता पाहायला मिळत आहे. ‘लढ रे’ हे गाणं हे विजेता सिनेमातील असून आता याच गाण्यावर या सिनेमातील कलाकारांनी घरातच बसून हा व्हिडीओ तयार केला आहे. 
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive