By  
on  

सिध्दार्थ जाधवने सोनाली कुलकर्णीला केला फोन, हे आहे कारण

सध्या लॉकडाउनमुळे प्रत्येक गोष्ट घरात राहूनच केली जात आहे. मग मनोरंजन विश्वातील कलाकारही सोशल मिडीयाचा वापर करतच प्रमोशनही करत आहेत. सध्या सोशल मिडीयाचा वापर हटके पद्धतिने करण्यात येतोय. त्यातच कलाकार हे चाहत्यांसोबत गप्पा मारण्यासाठी जास्तीत जास्त वेळ काढत आहेत. यासाठी सोशल मिडीयावर लाईव्ह येणं आणि विविध पोस्ट करणे हे सुरु आहे.

‘इरादा पक्का’ या मराठी सिनेमाला येत्या 23 एप्रिल रोजी दहा वर्षे पूर्ण होत आहे. याच निमित्ताने आद्या आणि रोहीत यांना पुन्हा भेटता येणार आहे. या सिनेमात अभिनेता सिध्दार्थ जाधव आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकले होते. आणि याच सिनेमाच्या आठवणी जागवण्यासाठी पुन्हा त्याच अंदाजात दोघं प्रेक्षकांना भेटण्यासाठी परत येत आहे. निमित्त आहे इन्स्टाग्राम लाईव्हचं. नुकतच सिध्दार्थ जाधवने रोहीतच्या भूमिकेत आणि सोनालीने आद्याच्या भूमिकेत येऊन एक व्हिडीओ पोस्ट केलाय. रोहीत हा आद्याला इन्स्टाग्रामवर लाईव्ह येणार असल्याचं सांगतोय मात्र आद्या लाईव्ह येणार की नाही याचं उत्तर तिने दिलेलं नाही. असं असलं तरी दोघांना या निमित्ताने पुन्हा एकत्र लाईव्ह पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. पुन्हा ही जोडी या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांसोबत गप्पा मारणार आहेत. 

सध्या लॉकडाउनमध्ये सोशल मिडीया हा चांगला दुवा बनला आहे. या निमित्ताने कलाकारांनाही त्यांच्या चाहत्यांसोबत बोलता येत आहे. सिध्दार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी ही जोडी ‘धुरळा’ या सिनेमातही झळकली होती. हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा कमालच करतात. आणि आता लाईव्ह येऊन दोघं धुरळा करतील यात शंका नाही.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive