लॉकडाऊनमुळे जिजा कोठारे आई-बाबांसोबत बराच वेळ घालवताना दिसत आहे. जिजा आणि आई उर्मिला लॉकडाऊनमुळे अनेक नवनवीन टास्क करून त्याचा व्हिडियोही शेअर करत असतात. ती आणि तिची आई उर्मिलाचा एक मिनी व्लॉगसुध्दा आहे. ह्यात दोघींचे अनेक धम्माल किस्से, टास्क, मनोरंन असं सर्वकाही पाहायला मिळतं.
लॉकडाऊनमधील वेळेचा उपयोग उर्मिला लाडकी लेक जिजाला ती नवनवीन गोष्टी व टास्क शिकविण्यासाठी करतेय. अलीकडेच उर्मिलाने एक नवीन टास्क सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा टास्क आहे फ्रुट कटिंगचा. जिजाला आईने खेळण्यातील फळं दिली आहेत. ती योग्य करायचा टास्क जिजा आवडीने पुर्ण करताना दिसत आहे. याशिवाय ती वेगवेगळ्या फळांची नावंही अगदी सहज ओळखताना दिसते. एकुणच काय जिजा आणि आई क्वारंटाईनमध्ये धमाल मस्ती सुरु आहे.