By  
on  

सोनाली कुलकर्णीने शेयर केली या 10 वर्षांपूर्वीच्या सिनेमाची आठवण

जुन्या आठवणींना उजाळा देत असताना त्या आठवणी ताज्या होतात. सध्या लॉकडाउनमध्ये कलाकार मंडळीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.


अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तर चक्क तिच्या 10 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ‘इरादा पक्का’ या तिच्या सिनेमाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि याच निमित्ताने सोनालीने या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेयर केली आहे. सोनालीने नुकत्यात केलेल्या पोस्टमध्ये तिचे दहा वर्षांपूर्वीचे फोटो शेयर केले आहेत.या पोस्टमध्ये सोनाली लिहीते की, “जिथून इरादा पक्का केला.. ‘इरादा पक्का’ची लुक टेस्ट, पहिल्यांदा आद्या म्हणून ऊभी राहिले. आणि शेवटी लक्षात आलं की मी तीच आहे किंवा ती मीच आहे. जसं केदार सर म्हटले तसं.”

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जिथून इरादा पक्का केला .... #IraadaPakka ची #looktest पहिल्यांदा #Aadya म्हणून ऊभी राहिले.... आणि शेवटी लक्षात आलं की मी तीच आहे किंवा ती मीच आहे.... just like Kedar sir said .... #Repost @kedaarshinde with @get_repost ・・・ “इरादापक्का” या फिल्मला release होऊन आज १० वर्ष झाली. रोहित आणि आद्या यांची अनोखी प्रेम कहाणी!! तोवर मराठीत असा विचार कुठल्याही फिल्मसाठी केला गेला नव्हता. त्यानंतर दोन चार मराठी चित्रपटात हा विषय उलट सुलट करून मांडलेला मी पाहिलाय. असो.. आपण कुठल्याही गोष्टीची सुरूवात ठरलो हेच खुप! @siddharth23oct @sonalee18588 यांचा मॅडनेस पूर्णपणे या फिल्ममधे दिसून येतो. त्यापूर्वी मी या दोघांसोबत “बकुळा नामदेव घोटाळे” केला होता. या फिल्मच्या निमित्ताने @siddharth23oct एक corporate lookमधे सादर करण्याचा प्रयत्न केला. @sonalee18588 ही मुळ स्वरूपात आद्याच आहे!!! १०वर्ष!! काळ किती पटपट सरकतो. आणि या वर्षांमधे दोघांच्याही आयुष्यातला लक्षणीय बदल मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. Thank you to the entire team of this film for making it so special. @smitameghe @irakarnik @nilesh_moharir @ashwinithepoem @jrahul11 @atulshidhaye @nihirajoshi_music @kshitijtarey @omkar_mangesh @gaurikongeactress @kelkaraniket @atultodankar2010_official YOU CAN WATCH THIS FILM ON @primevideoin NOW!

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588) on

या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या सिनेमाची आठवण म्हणून सिनेमाच्या सेटवरील फोटो पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

“इरादापक्का” या फिल्मला release होऊन आज १० वर्ष झाली. रोहित आणि आद्या यांची अनोखी प्रेम कहाणी!! तोवर मराठीत असा विचार कुठल्याही फिल्मसाठी केला गेला नव्हता. त्यानंतर दोन चार मराठी चित्रपटात हा विषय उलट सुलट करून मांडलेला मी पाहिलाय. असो.. आपण कुठल्याही गोष्टीची सुरूवात ठरलो हेच खुप! @siddharth23oct @sonalee18588 यांचा मॅडनेस पूर्णपणे या फिल्ममधे दिसून येतो. त्यापूर्वी मी या दोघांसोबत “बकुळा नामदेव घोटाळे” केला होता. या फिल्मच्या निमित्ताने @siddharth23oct एक corporate lookमधे सादर करण्याचा प्रयत्न केला. @sonalee18588 ही मुळ स्वरूपात आद्याच आहे!!! १०वर्ष!! काळ किती पटपट सरकतो. आणि या वर्षांमधे दोघांच्याही आयुष्यातला लक्षणीय बदल मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय.

A post shared by Kedaar Yeshodhara Shinde (@kedaarshinde) on

या सिनेमात सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सिध्दार्थ जाधव ही जोडी झळकली होती. या सिनेमातीली गाणीही प्रसिद्ध झाली होती. नुकतच या सिनेमाला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनाली आणि सिध्दार्थ हे इन्स्टाग्रामवरही लाईव्ह आले होते. तिथेही त्यांनी या सिनेमातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या सोनेरी आठवणी या कलाकारांना भरपुर समाधान देऊन गेल्या असतील यात शंका नाही. 
  
 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive