By  
on  

'माऊली' सर्जेराव देशमुख आणि टीम देव दर्शनाला

अभिनेता रितेश देशमुखचा 'माऊली' हा लय भारी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमानिमित्ताने संपूर्ण टीम सध्या जोरदार प्रोमोशन करतेय. पण या प्रोमोशनच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत पंढरपूर येथे विठू माऊलीचे आणि जेजुरी येथील खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेतले व सिनेमाच्या यशासाठी मनोभावे प्रार्थना केली. यावेळी रितेश देशमुख, सैयामी खेर, सिध्दार्थ जाधव आणि जितेंद्र जोशी ही सिनेमातील सर्व प्रमुख कलाकरांची उपस्थिती होती.

https://twitter.com/Riteishd/status/1072332729558163456

'माऊली' हा सिनेमा येत्या १४ डिसेंबर रोजी संपूर्ण  महाराष्ट्र तसेच परदेशातही प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सध्या रितेश देशमुख आणि सैयामी खेर करत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनची एकही संधी 'माऊली' टीम सोडत नाही असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

https://www.instagram.com/p/BrQBYU5HB2N/

Recommended

PeepingMoon Exclusive