By  
on  

रणवीर सिंहने अमृता खानविलकरला दिलं असंही एक सरप्राईज

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री अमृता खानविलकर बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंहची खुप मोठी चाहती आहे, हे आता जगजाहीर झालं आहे. रणवीरदेखील आपल्या या ग्लॅमरस अभिनेत्री मैत्रिणीला दरवेळी काही न काही सरप्राईज देताना आपल्याला दिसून येतो.
मात्र, त्याने यावेळी अमृताला दिलेलं सरप्राईज या सर्वांहून हटके आहे. कारण, आपापल्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे या दोघांना प्रत्यक्षात भेटणं शक्य नव्हतं, पण रणवीरने वेळात वेळ काढत अमृताच्या थेट सेटवर जाऊन तिची भेट घेतली. रणवीरचे हे सरप्राईज व्हिजिट अमृतासाठी मात्र आनंदाचा मोठा धक्काच ठरला !
त्याचे झाले असे की, जोगेश्वरी येथील फिल्मिस्थान स्टुडियोमध्ये सोनी मराठीच्या 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे शूटिंग चालू होते. त्याच जवळपास सुरु असलेल्या एका हिंदी कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये रणवीर सिंह आपल्या आगामी 'सिंबा' सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यादरम्यान अमृतादेखील इथेच असल्याचं त्याच्या लक्षात आले. सोशल नेटवर्किंगद्वारे सतत जरी भेटत असलो तरी, प्रत्यक्षात भेटण्याची ही नामी संधी त्याने हेरली आणि तो थेट 'सुपर डान्सर महाराष्ट्राचा' शोच्या सेटवर जाऊन धडकला.

https://www.instagram.com/p/BrSSrSGl--S/

रणवीरच्या येण्यानं केवळ अमृतालाच नव्हे तर सेटवरील बच्चेकंपनीला देखील खुप आनंद झाला आणि अमृतासह यासर्वांनी मिळून काही क्षण या 'सिंबा'सोबत भरपूर धम्माल केली.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive