By  
on  

'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट असा इतिहास घडवेल ह्याची कल्पना नव्हती : निवेदिता सराफ

करोनाच्या वाढत्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊन काळ सुरु आहे. सर्वचजण घरात राहून छोट्या पडद्यावर मनोरंजनाच्या विविध मेजवानींचा आस्वासर्दवांनाच घेत आहेत. काल रविवार असल्याने सर्वांनाच वर्क फ्रॉम होम व इतर कामांना सुट्टी असल्याने अनेक वाहिन्या या दिवशी सिनेरसिकांच्या आवडीचे सिनेमे दाखवतात. छोट्या पडद्यावर रविवारी अशी ही बनवाबनवी दाखवला व नेहमीप्रमाणे सर्वांनी तो सहकुटुंब एन्जॉय केला. 

अशी ही बनवाबनवी हा सिनेमा तुम्ही कधीही कितीही वेळा पाहा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही,याउलट पुन्हा  पुन्हा पाहावासा वाटेल. या धम्माल -विनोदी सिनेमाने ९० च्या दशकांत धुमाकूळ घालत लोकप्रियतेचे अनेक उच्चांक मोडले. धम्माल संवाद, जबरदस्त गाणी आणि कलाकारांचा दमदार  अभिनय यामुळे हा सिनेमा सजला व आजही तो सिनेरसिकांच्या गळ्यातला ताईत आहे. 

अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मिकांत बेर्डे, सुशांत रे, सुधीर जोशी, विजू खोटे, सुप्रिया पिळगावकर, निवेदिता सराफ, प्रिया बेर्डे , नयनतारा,अश्विनी भावे या सर्वच कलाकारांनी सिनेमातून धम्माल उडवून देत इतिहास रचला. हा सिनेमा नुकताच पाहून अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीसुध्दा आपल्या आठवणींना उजाळा दिला. 

 

निवेदिता सराफ म्हणतात, "आज परत Zee Talkies वर अशी ही बनवाबनवी पाहिला तसा अगणीत वेळा पाहिला आहे. आजही तितकाच् enjoy केला. काय मज्जा केली होती shooting करताना. काही तरी खूप छान करतोय हे जाणवत होतं. पण हा चित्रपट असा इतिहास घडवेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या ऐतिहासिक चित्रपटाचा मी एक भाग होते ह्यासाठी मी परमेश्र्वराची खूप आभारी आहे. आज किती आठवणी दाटून आल्या आहेत.मन भरुन आलं आहे.आज आपल्यात जे नाहीतत्या सगळ्यांची खूप आठवण येते आहे.वसंत सबनीस, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर  जोशी,विजु खोटे, सुशांत रे, जयराम कुलकर्णी, नयनतारा, अरुण पौडवाल, सुहास भालेकर, बिपिन वर्टि, गुलाब कोरगावकर ह्या सगळ्यांना मी आदरांजली वहाते"

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आज परत Zee Talkies वर अशी ही बनवाबनवी पाहिला तसा अगणीत वेळा पाहिला आहे. आजही तितकाच् enjoy केला. काय मज्जा केली होती shooting करताना. काही तरी खूप छान करतोय हे जाणवत होतं. पण हा चित्रपट असा इतिहास घडवेल ह्याची कल्पना नव्हती. ह्या ऐतिहासिक चित्रपटाचा मी एक भाग होते ह्यासाठी मी परमेश्र्वराची खूप आभारी आहे. आज किती आठवणी दाटून आल्या आहेत.मन भरुन आलं आहे. आज आपल्यात जे नाहीत त्या सगळ्यांची खूप आठवण येते आहे. वसंत सबनीस, लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी,विजु खोटे, सुशांत रे, जयराम कुलकर्णी, नयनतारा, अरुण पौडवाल, सुहास भालेकर, बिपिन वर्टि, गुलाब कोरगावकर ह्या सगळ्यांना मी आदरांजली वहाते

A post shared by Nivedita Ashok Saraf (@nivedita_ashok_saraf) on

 

निवेदिता सराफ यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सर्वांनीच हा सिनेमा आमचा ऑलटाईम फेव्हरिट असल्याचं सांगत, सिनेमाच्या आठवणी शेअर केल्या आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive