बाळूमामाच्या नावानं चांगभलं,या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला अभिनेता सुमित पुसावळे आज प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. लाघवी व्यक्तिमत्त्वामुळे तो सर्वांचाच लाडका आहे. त्याचा अभिनय प्रवास तर खुपच रंजक आहे, तुम्ही तो नक्कीच जाणून घ्यायला हवा.
सुमित हा छोट्या गावात लहानाचा मोठा झाला. त्याने शालेय शिक्षण याच छोट्या गावातून म्हणजेच दीघंजी मधून पूर्ण केले. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी पुण्याला आला.
सुमितने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. त्याने गावात आई-बाबांसह एक छोटं हॉटेलंही आहे.
सुमितला लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. तो शाळा, कॉलेजच्या नाटकांमध्ये अभिनय साकारायचा.
झी मराठीवरील लागीर झालं जी या लोकप्रिय मालिकेत सुम्या हे नकारात्मक पात्र सुमितने साकारलं होतं. तसंच स्वराज्य रक्षक संभाजी या झी मराठी वरील मालिकेमध्ये छोटीशी भूमिका केली होती.
खरंतर बाळूमामा या मालिकेच्या सुरुवातीच्या भागांमध्ये एक छोटी भूमिका सुमितेन केली होती, तेव्हा बाळूमामांच्या बालपणीचे भाग सुरु होते.
जेव्हा बाळूमामांच्या तरुणपणीच्या व्यक्तिरेखेसाठी ऑडीशन सुरु होत्या , तेव्हा सुमितला ऑडीशनसाठी बोलावण्यात आलं होतं व त्याची निवडही झाली.
आता लॉकडाऊन दरम्यान सुमितसुध्दा आपल्या गावी आहे. तो छान शेतात रमला आहे. शेतीकाम व हॉटेलची साफसफाई व कुटुंबियांसोबत तो वेळ घालवतोय.
'
सुमितला आता बाळूमामाच्या सेटची आठवण येऊ लागलीय व शूटींग तो प्रचंड मिस करतोय, पण दरम्यान चाहत्यांशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात राहण्याची संधी तो अजिबात सोडत नाही