By  
on  

 या कुरळे बंधुंना ओळखलत का ? हे मराठी स्टार झळकले होते एकत्र

सध्या जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा काळ सुरु  आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लॉकडाउनमध्ये घरी बसलेले आपण सगळे जुने सोनेरी क्षण पुन्हा नव्याने आठवून त्याची मजा लुटतोय. यातच जुने फोटो सापडले तर मग त्याची मजा काही औरच म्हणावी लागेल. कलाकारांनाही त्यांचे जुने फोटो पाहून या आठवणींमध्ये रमावसं वाटतय. हे  जुने फोटो ते सोशल मिडीयावर पोस्ट करून या आठवणींमध्ये रमत आहेत. अभिनेता भरत जाधव यांनीही त्यांच्या एका सिनेमाची खास आठवण शेयर केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कुरळे बंधू..!!

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

 

‘साडे माडे तीन’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाची ही आठवण आहे. या चित्रपटातील एक फोटो त्यांनी पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये भरत जाधव स्वत: , अशोक सराफ आणि मकरंद अनासपुरे आहेत. या चित्रपटात या तिघांच्या कुरळ्या केसांची  स्टाईल प्रचंड प्रसिद्ध झाली होती. आणि याच कुरेळ बंधुंचा फोटो भरत जाधव यांनी पोस्ट केला आहे. या फोटोला कुरळे बंधू असं कॅप्शन देत ही खास आठवण भरत जाधव यांनी शेयर केली. नेटकऱ्यांना हा फोटो चांगलाच आवडला असून फोटोवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. या चित्रपटात सिध्दार्थ जाधव  आणि अमृता खानविलकर हे कलाकारही झळकले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

2001

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat) on

या शिवाय आणखी काही जुने फोटो भरत जाधव यांनी त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट केले आहेत. 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive