By  
on  

सचिन पिळगावकर यांच्या यशाचं रहस्य माहितेय का?

महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहितच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली ३ दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. असाच किस्सा घडला 'सोहळा' या चित्रपटाच्या शुट दरम्यान. या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सचिन पिळगावकर यांच्या शिस्तीविषयी एक नवी ओळख करून दिले.
गजेंद्र अहिरे म्हणतात की, सचिन पिळगावकर गेली कित्येक वर्षे या क्षेत्रात काम करत असले तरीही त्यांची एनर्जी एखाद्या तरुणाप्रमाणेच आहे. प्रत्येक गोष्ट शिकून, समजूनच ते आत्मसात करतात. एवढंच नव्हे तर त्यांच्यातील शिस्तप्रियताही तरुणांनी शिकून घ्यायला हवी. सकाळी ६ चं शूट असेल तर सचिन पिळगावंकर पहाटे ५.३० लाच मेकअप करून तयार राहत असत. एवढंच नव्हे तर, या सिनेमातील एक दृष्य भल्या पहाटेचं आहे. वातावरणातील निळ्या रंगात हा सिन शूट करायचा होता. पहाटे ४, ४.३० च्या दरम्यान समुद्र किनारी निळा रंग पसरतो. केवळ १० ते १५ मिनिटेच वातावरणाचा हा अविष्कार असतो. मात्र सचिन पिळगावकर, विक्रम  गोखले, मोहन जोशी, लोकेश गुप्ते यांनी पहाटे येऊन हे शूट पूर्ण केलं. कामाप्रती असलेली ही त्यांची निष्ठा वाखणण्याजोगी आहे. कलाकाराचे यश हे त्यांच्या कामावर असलेली निष्ठा आणि त्यांच्या अंगी असलेल्या शिस्तीवरच अवलंबून असतं. म्हणूनच सचिन पिळगांवकर आजही मराठी रसिकांसाठी प्रिय आहेत.

अरिहंत प्रॉडक्शन या बॅनरखाली सिनेमाची निर्मिती करण्यात आली असून सोहन बोकाडिया व सुरेश गुंदेचा हे निर्माते आहेत. तर के.सी बोकाडिया यांनी सिनेमाची प्रस्तुती केली आहे. येत्या २१ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'सोहळा' या सिनेमात एकूण चार गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive